शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मतदान न करणाऱ्यास गुजरातमध्ये १०० रुपये दंड

By admin | Updated: August 8, 2015 09:19 IST

मतदान टाळणाऱ्यांना जुजबी १०० रुपये दंड आकारण्याचा पहिला प्रयोग गुजरातमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्ताने पार पडणार आहे.

गांधीनगर : मतदान सक्ती करण्याचा मान पटकावणारे गुजरात हे पहिले राज्य बनले असले तरी मोठा गाजावाजा करून आणलेल्या अनिवार्य तरतुदींसाठी पळवाट काढून देण्यात आली आहे. मतदान टाळणाऱ्यांना जुजबी १०० रुपये दंड आकारण्याचा पहिला प्रयोग पालिका निवडणुकीच्या निमित्ताने पार पाडला जाणार आहे.गुजरात सरकारने स्थानिक प्राधिकरण कायदा (सुधारणा) २००९ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चौफेर टीका झाली. मतदान टाळणाऱ्यांना शिक्षा ठोठावण्याचा, आर्थिक दंड आकारण्याचा किंवा सक्तीची सेवा करवून घेण्यासारखी कारवाई केली जाण्याची अपेक्षा होती. हेतुपुरस्सर मतदान टाळले जात असेल तर सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यासारखी कठोर पावले उचलण्याचा सरकारने विचार चालविल्याचेही वृत्त होते. प्रत्यक्षात १०० रुपये दंडावर समाधान मानण्यात आले. अनेक वर्षांपासून गुजरातच्या पालिका निवडणुकीबाबत लोकांमध्ये निरुत्साह दिसून आलेला आहे. सरासरी ५० ते ६० टक्केच मतदानाची नोंद झालेली आढळते. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात पंचायत निवडणूक (सुधारणा) नियम २०१५ महापालिका निवडणूक नियम (सुधारणा)२०१५ नुसार मतदान घेणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यानुसार मतदान न करणाऱ्यांना १०० रुपये दंड आकारण्यात आला. यापूर्वी ५०० रुपये दंडाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता; मात्र मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची भीती होती. नोटीस जारी करण्यासाठी चमू स्थापन करण्यासह दरवर्षी मतदान टाळणाऱ्यांचा आढावा घेणाऱ्या अ‍ॅपिलेट प्राधिकरणाची नियुक्ती आदींवरील खर्च प्रशासनाला करावा लागणार आहे. याचा अर्थ प्रत्येक १०० रुपयांच्या वसुलीवर करावा लागणारा खर्च मोठा असेल. अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्यानंतर संबंधितांना कारणे देण्यासह संबंधित पुरावे सादर करावे लागतील. सवलत नाकारली जात असेल तर अंतिम आदेशानंतर १५ दिवसांत दंड भरावा लागेल. ६ महापालिका, ६० नगर परिषदा, ३३ जिल्हा पंचायती, १५० तालुका पंचायतीसाठी आॅक्टोबरमध्ये निवडणूक होत आहे.(वृत्तसंस्था)