शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास १० वर्ष सक्तमजुरी

By admin | Updated: February 21, 2016 00:31 IST

जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने तांबोळा (ता.चाळीसगाव) येथील भाऊसाहेब नाना पाटील (वय २६) या आरोपीस प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी शनिवारी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने तांबोळा (ता.चाळीसगाव) येथील भाऊसाहेब नाना पाटील (वय २६) या आरोपीस प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी शनिवारी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची थोडक्यात हकिकत अशी, चाळीसगाव येथील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी २५ मे २०१३ रोजी तिच्या मैत्रिणीसह उरूस पाहण्यासाठी गेलेली होती. त्या वेळी तिला तिचा विक्की नामक मित्र भेटला होता. ते आपसात बोलत असल्याने पाहून मुलीच्या काकाने विक्कीला मारहाण केली होती. मारहाणीत विक्कीचा भ्रमणध्वनी खाली पडला. तो भ्रमणध्वनी आरोपी भाऊसाहेबने उचलला होता. घटनेच्या दुसर्‍या दिवशी पीडित मुलीने विक्कीच्या भ्रमणध्वनीवर फोन केला. तेव्हा भाऊसाहेबने मी विक्कीचा मोठा भाऊ बोलत असल्याचे सांगून विक्की नाशिकला रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने तुला भेटायला बोलावले आहे, असे सांगितले होते. त्याला होकार दिल्याने भाऊसाहेबने तीन जून २०१३ रोजी पीडित मुलीला चाळीसगाव येथून त्याच्या सोबत नेले. तेथून तो तिला त्याचा शेवगाव (जि.अहमदनगर) येथील मित्र शंकर पाटील-गोरे याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केले. पाच जून २०१३ रोजी पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना फोन करून हकिकत सांगितली. तेव्हा तिचे वडील व काकांनी तिला घरी परत आणले. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात भाऊसाहेब विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
नऊ जणांच्या महत्त्वपूर्ण साक्ष
गुन्‘ाच्या तपासानंतर तपासाधिकारी व्ही.एस. देवरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे ॲड.संभाजी पाटील यांनी पीडित मुलगी, तपासाधिकार्‍यांसह एकूण नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. त्या ग्रा‘ धरल्याने आरोपीवर दोषारोप सिद्ध झाला. आरोपीतर्फे ॲड.एस.के. कौल यांनी काम पाहिले.