जनावरांचे १० टन मांस पकडले
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
(फोटो)
जनावरांचे १० टन मांस पकडले
(फोटो)जनावरांचे १० टन मांस पकडलेचौघांना अटक : २० लाख ६४ हजारांचा ऐवज जप्तनागपूर : बुटीबोरी पोलिसांनी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बोरखेडी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांचे १० टन मांस पकडले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मांस व ट्रक असा एकूण २० लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.मोईन अख्तर मोहम्मद जहीद (४२), मोहम्मद ऐफाज मोहम्मद अशपाक (२५), मोहम्मद सलीम मोहम्मद इस्माईल (२६) व मोहम्मद खुर्शीद मोहम्मद रियाज (२६) सर्व रा. कामठी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने ट्रकमध्ये जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बोरखेडी शिवारात नाकाबंदी करून ट्रकची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/वाय-९५१ क्रमांकाच्या ड्रममध्ये बर्फात जनावरांचे मांस ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रकमधील चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मांस व ट्रक जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये १० लाख रुपये किमतीचे १० टन मांस व ट्रक असा एकूण २० लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***