शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटींच्या ठेवीसाठी १० हजार अर्ज बीएचआर पतसंस्था : ७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड

By admin | Updated: July 14, 2016 21:35 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेवर अवसायक जितेंद्र कंडारे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये नियुक्ती झाली आहे. नियुक्तीला ९ महिन्यांचा कालावधी उलटला असताना ठेवीदारांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
१० हजार ठेवीदारांचे अर्ज
बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तसेच तक्रार अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी अवसायकांनी नियुक्त केले आहे. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यभरातील १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या १० हजार ठेवीदारांचे सुमारे २५० कोटी रुपयांची रक्कम पतसंस्थेकडे घेणे आहे.
ऑडिट झालेल्या शाखांमध्ये ६५० कोटींच्या ठेवी
बीएचआर पतसंस्थेच्या १५० शाखांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. तर १० शाखांचे ऑडिट हे अंतिम टप्प्यात आहे. १५० शाखांमध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तर सुमारे ५५० कोटी रुपयांची कर्जवाटप झालेली आहे. उर्वरित शाखांमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व शाखांमधील एकूण ठेवी आणि कर्जाची रक्कम याचा ताळमेळ बसणार आहे.

७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड
बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेऊन परतफेड न करणार्‍या कर्जदारांना लवादकांनी नोटीस काढल्या आहेत. त्यात ५५४ कर्जदारांकडील वसुलीसाठी अवार्डची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार वसुलीसाठी दरखास्त देण्यात आली आहे. १५२ कर्जदारांची अवार्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकुण ७०६ कर्जदारांच्या १०७ कोटी ३३ लाखांच्या मालमत्तांचे अवार्ड करण्यात आले आहे.

आठ कोटींची वसुली तरी ठेवीदार उपाशी
अवसायकांनी आतापर्यंत कर्जदारांकडून ८ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. तसेच वस्तू व मालमत्तांच्या विक्रीची निविदा काढली आहे. कर्जदारांकडून रकमेची वसुली होत असताना ठेवीदारांना मात्र ठेवी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या रकमेतून वैद्यकीय उपचार, लग्न या कारणांना महत्त्व देत ठेवींचे वितरण केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. अवसायकांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.