शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार

By admin | Updated: May 28, 2017 04:31 IST

काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वनीचा वारसदार सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला आहे. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला. सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. किमान ५0 ठिकाणी दगडफेक सुरू झाली. हिंसाचारामुळे बऱ्याच भागांमध्ये बंदसदृष्य वातावरण असून, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन या भागांत सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरल्याने, खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. वणी मारला गेल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात भडकलेल्या हिंसाचारात सुमारे १00 जण मरण पावले होते.राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी सबजार व त्याच्या साथीदार असलेल्या एका इमारतीच्या परिसराला वेढा घातला. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. त्या दोघांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू करताच, प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सबजार व त्याचा साथीदार ठार झाले, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)कोण आहे सबजार? गेल्या वर्षी ८ जुलै रोजी लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वनी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली. सब डॉन म्हणून तो काश्मीर खोऱ्यात ओळखला जायचा. वनीच्या मृत्युनंतर मेहमूद गझनवीला कमांडर केल्याचे हिजबुलने जाहीर केले होते, पण गझनवीविषयी कोणालाच माहिती नसून, सबजारचेच ‘गझनवी’ हे टोपण नाव असावे, असा अंदाज आहे. सबजारवर १० लाखांचे इनाम होते.सबजार हा वनीचा विश्वासू साथीदार होता. वनीबरोबर त्याने दोन वर्षे काम केले होते. हिजबुलच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती होती. सबजारचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सबजार दहशतवादी कृत्यांकडे वळला. बुरहान वनीचा मोठा भाऊ खालिद याची हत्या झाल्यानंतर, आंदोलन सुरू असताना सबजारने एका अधिकाऱ्याच्या हातून बंदूक हिसकावली होती. त्यानंतर, त्याला हिजबुलमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले होते. दोन अतिरेकी ठारपुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला करणारे दोन दहशतवादीही चकमकीमध्ये ठार झाले. साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हा हल्ला होताच, जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घालून त्यांचा शोध सुरू केला. त्या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले.मुंबई, दिल्लीत अ‍ॅलर्टपाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. त्यामुळे रेल्वे स्थानके, विमानतळे, हॉटेल्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणची गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीती व्यक्त होत आहे.