१०...सारांश
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
रेतीचोरीला आळा घालण्याची मागणी
१०...सारांश
रेतीचोरीला आळा घालण्याची मागणीमौदा : तालुक्यातील सांड व सूर नदीच्या पात्रातून खुलेआम रेतीचोरी होत आहे. यात काही स्थानिक नेत्यांचे हितसंबंध गुंतले असल्याने मौदा व अरोली पोलीस या रेतीचोरीकडे दुर्लक्ष कराीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या रेतीचोरीला आळा घालण्याची मागणी केली आहे. ***सेतू केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दीकाटोल : बारावी व दहावीचे निकाल जाहीर झाले असून, पुढील शिक्षणासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज भासते. काही प्रमाणपत्रे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातून घ्यावी लागत असल्याने ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी काटोल येथील सेतू केंद्रात गर्दी केली आहे. ***राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधातउमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामुळे ऐन खरीप हंगामात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच विविध राजकीय पक्षांनी योग्य उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे. ***आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करा!सावनेर : काही नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नाहीत. हे नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता बळावल्याने तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे. ***भारनियमनामुळे नागरिक हैराणनरखेड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जाते. सध्या दमट वातावरणामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने भारनियमनाचा कालावधी कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ***डासप्रतिबंधक औषधांची धुरळणी कराखापरखेडा : परिसरातील गावांमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावात डास प्रतिबंधक औषधांची धुरळणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. *** ८४० नागरिकांना चष्म्यांचे वाटपकामठी : स्थानिक भगवती मंदिरात हलके सफेलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ८४० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रणजित सफेलकर, कपिल गायधने, नियाज अहमद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ***