१०.... सारांश... जोड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
देवलापार येथे धार्मिक कार्यक्रम
१०.... सारांश... जोड
देवलापार येथे धार्मिक कार्यक्रमदेवलापार : स्थानिक गुप्तगंगा संस्थान येथे श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात अभिषेक, पूजा, हवन, महाआरती आदी कार्यक्रम पार पडणार असून, महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.***माती परीक्षण करण्याचे आवाहननरखेड : हल्ली सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात घट होत आहे. या पिकांना आवश्यक असलेल्या मातीतील घटकांच्या कमतरतेमुळे सदर प्रकार घडत आहे. सर्वच पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करवून घ्यावे तसेच कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.***मटन मार्केटमुळे नागरिक त्रस्तमौदा : स्थानिक मटन व चिकन मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात मांसाचे तुकडे व टाकाऊ पदार्थ उघड्यावर फेकले जातात. त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या परिसरात दुुर्गंधी सुुटली आहे. यावर स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ***कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानउमरेड : ग्रामीण भागात भारनियमनासोबतच कमी दाबाच्या विजेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतातील मोटरपंप जळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना कृषिपंपाची वीज योग्य दाबाची पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***