शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

१० जिवंत झाडांची कत्तल दुर्लक्ष : खोटेनगरातील पोलीस कॉलनीतच झाडांवर कुर्‍हाड

By admin | Updated: February 14, 2016 00:42 IST

सोबत फोटो- १४ सीटीआर १५ व १७

सोबत फोटो- १४ सीटीआर १५ व १७

जळगाव : शहर व परिसरात वृक्षांची कत्तल वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे शनिवारी पुन्हा खोटे नगरातील जुन्या पोलीस कॉलनीमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १० जिवंत झाडांची कत्तल करण्यात आली. याकडे वनविभाग व मनपाचेही लक्ष नसल्याने असे प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

आपापल्या सोयीसाठी प्रत्येकजण झाडांची कत्तल करीत असल्याच्या घटना दर आठवड्याला समोर येत आहे. गेल्या आठवड्यात कालिंका देवी मंदिराच्या समोरील भागात, त्या पूर्वी शिरसोली रस्त्यावर एका महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. त्या नंतर आता पुन्हा शनिवारी दुपारी खोटे नगरातील जुन्या पोलीस कॉलनीमध्ये १० झाडे तोडण्यात आली.

भींतीच्या कुंपणासाठी झाडांवर कुर्‍हाड...
पोलीस कॉलनीतील एका घराच्या शेजारी ही झाडे तोडण्यात आली असून त्या ठिकाणी भींतीचे कुंपण करायचे असल्याने वृक्ष तोडण्यात येत असल्याचे तेथे सांगण्यात आले. हे झाड आम्हीच लावले असून त्यास परवानगीची गरज काय असा उलट प्रश्न या वेळी करण्यात आला.
कत्तल केलेल्या झाडांमध्ये आंबा, बाभूळ या वृक्षांचा समावेश असून यामध्ये तीन ते चार झाडे चांगली मोठी वाढलेली होती तर इतर झाडे त्या खालोखाल होती.

जामनेरच्या मजुरांना दिले काम...
या ठिकाणी पाहणी केली असता तेथे काही मजुरांमार्फत झाडे तोडण्यात येऊन केवळ खालचे खोड जमिनीत होते तर एका झाडाचे खोड अर्ध्यापर्यंत तोडलेले होते. त्यावेळी मजुरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला या लोकांनीच झाड तोडायची सांगितली. आम्ही जामनेरचे असून त्यांच्या सांगण्यावरून झाड तोडले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर खुलेआम वृक्ष तोड झाली तरी त्याकडे वनविभाग अथवा मनपाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे.