शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१0 जागांनी दिला भाजपाला दगा, कमी मतांनी पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:16 IST

कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे.

बंगळुरु : कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे.भाजपाचे १0 उमेदवार ३000 हजारांहून कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्या मतदारसंघांकडे अधिक लक्ष दिले असते, राज्य व राष्ट्रीय नेत्यांनी तिथे मदत केली असती, तर ते निवडून आले असते, असे तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या जागा निश्चित निवडून येतील, असा पक्षनेत्यांचा अंदाज होता आणि या अंदाजानेच भाजपाला दगा दिला.रायचूर जिल्ह्यातील मास्की मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार अवघ्या २१३ मतांनी पराभूत झाले. तिथे काँग्रेसचा विजय झाला. तसेच अन्य सहा जागांवर २000 हून कमी मतांनी भाजपाच्या उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. चिकमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे, असा भाजपाला विश्वास होता. तिथे भाजपाचे डी. एन. जीवराज यांना प्रत्यक्षात पराभवाला सामोरे जावे लागले. सीमा भागातील अथणी मतदारसंघातील लक्ष्मण सवदी यांच्या विजयाचीही भाजपाला खात्री होती. पण ते अतिशय कमी मतांनी पराभूत झाले. या जागांवर विजय मिळला असता, तर भाजपाच्या हाती सत्तेच्या किल्ल्या सहजच मिळाल्या असत्या.>मते फुटल्याचा लाभचामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व जनता दल (ध) चे टी. जी. देवेगौडा यांच्यात मतांची फाटाफूट होईल आणि त्यात आपला उमेदवार विजयी होईल, असे भाजपा नेत्यांना वाटत होते.तिथे सिद्धरामय्या पराभूत झाले. पण जनता दलाचे देवेगौडाच जिंकून आले.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८