१०... नरखेड... उमठा
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
(फोटो)
१०... नरखेड... उमठा
(फोटो)पोलिसांवरील हल्ल्याचा निषेधउमठा येथे ग्रामसभेचे आयोजन : अवैध दारू विक्री बंदीचा ठराव पारितनरखेड : तालुक्यातील उमठा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दारू पकडण्यासाठी जलालखेडा पोलिसांनी धाड टाकली असता, पारधी समाजाच्या काही लोकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. शिवाय, उमठा येथील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.उमठा येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून, त्याला कायमचा आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे होते. यावेळी जलालखेड्याचे ठाणेदार पीतांबर जाधव, उपनिरीक्षक अनिल राऊत, सरपंच प्रवीण दहेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुंडलिक घोरपडे, विघे गुरुजी, आदिवासी विकास परिषदेचे कृष्णा चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.येथील पारधी बेड्यावरील लोकांनी २७ जानेवारी रोजी जलालखेडा पोलिसांवर हल्ला केला. त्यात १० पोलीस जखमी झाले. शिवाय, पोलिसांवर खोटे आरोप करण्यात आले. या अवैध दारू विक्रीमुळे स्थानिक व परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काही मंडळी देशी दारूसोबतच विदेशी दारूचीही विक्री करतात. त्यामुळे येेथील दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी, असा एकमताने निर्णय घेण्यात आला असून, ठराव पारित करण्यात आला.येथील अवैध दारू विक्रीला आळा घातला जाईल. गावातील परवानाधारक दारूचे दुकान बंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. यासाठी स्थानिक नागरिकांसह महिलांची पूर्ण तयारी असल्यास आपण सदर गाव दारूविक्रीमुक्त करण्यासाठी सदैव सहकार्य करू, असे आश्वासन ईश्वर कातकडे यांनी दिले. (तालुका प्रतिनिधी)***