शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात. ऑर्डरप्रमाणे दागिने घडविण्याचेही काम करतात. सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पि›म बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पि›म बंगाल) दोन्ही.ह.मु.सिताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणार्‍या कारागिरांशी त्यांची ९ वर्षापासून ओळख होती. त्यातून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले होते. २२ फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची ऑर्डर आली. त्यामुळे भामरे यांनी राकेश व सुशांता या दोघांना त्यादिवशी दुकानात बोलावून घेतले व ईअर रिंग ३ ग्रॅम ५३ जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह ३५ ग्रॅमप्रमाणे २ नग व मंगळसूत्र वाटी २ ग्रॅम जोडी प्रमाणे ६० नग अशी ऑर्डर दिली. त्यासाठी ३५० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट या दोघांच्या ताब्यात दिले. यावेळी बंगाली समाजाचे सोनार भिकुराम संत्रा हे देखील उपस्थित होते.
बिस्कीट मिळताच ठोकली धूम
सोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली. ऑर्डर घेतांना या दोघांनी भामरे यांना ४ ते ५ दिवसात सोने बनवून देतो असे सांगितले होते, त्यानुसार भामरे यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता दोघांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी भामरे गेले, मात्र तेथील सहकार्‍यांनी सुशांता व राकेश हे दोन्ही जण कोणालाच काहीही न सांगता बाहेरगावी गेल्याचे समजले.हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भामरे यांनी दोघांचा परिसरात शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.