शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद

By admin | Updated: January 26, 2017 23:09 IST

काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 26 - काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे. बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले. लष्करानं शोधमोहीम राबवत आतापर्यंत एका अधिका-यासह सात जवानांना वाचवण्यात यश मिळवलं आहे. उर्वरित शहीद जवानांचे मृतदेह बर्फाच्या ढिगा-याखालून काढण्यात आले आहेत. गुरेझ सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत असतानाच जवानांच्या पथकावर काळाने घाला घातला. जवानांच्या बचावासाठी मदत कार्य राबवण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असून, हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी काल मध्य काश्मिरमधील गंदेरबाल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे झालेल्या हिमस्खलनात लष्करी अधिकारी शहीद झाला होता. तर गुरेझ सेक्टरमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.