शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलासाठी १० टक्के सवलतीची योजना

By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST

कृषी समिती बैठक : महावितरणचा निर्णय

कृषी समिती बैठक : महावितरणचा निर्णय
नाशिक : पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकीत असल्यास थकीत रकमेच्या एकूण १० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम १५ समान हप्त्यात वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनीने घेतल्याची माहिती विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत दिली.
सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक काल (दि.१०) झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर माल साठवणूक करण्यासाठी जि.प. मालकीचे गुदाम बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेस प्रस्ताव सादर करण्याबाबत सभापतींनी सूचना दिल्या. आत्मा प्रकल्पांतर्गत एकूण ६०३ कांदाचाळींचे चार कोटी ६३ लाख इतके अनुदान वाटप करण्यात आल्याबाबतची माहिती सदस्यांना आत्मा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी दिली. महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी थकीत पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांबाबत नवीन शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती दिली. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी सिंगल फेज योजना बंद झाल्याबाबत व दीनदयाळ योजनेंतर्गत गावठाण फिडर योजना चालू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीग्रस्त योजनंेतर्गत सुरगाणा तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश सभापती केदा अहेर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यात आनंदी राऊत-२५ हजार, लक्ष्मण बढाले-२२ हजार ५००, विठ्ठल भोये- २५ हजार, रघुनाथ कडू - २५ हजार, अंबादास बागू-२० हजार, दत्तू बागुल-२५ हजार आदिंना एकूण १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. बैठकीस सदस्य केरू पवार, सुभाष चौधरी, श्रीमती भावना भंडारी, श्रीमती रंजना पवार, सुनील चव्हाण, मनीषा बोडके, संपतराव सकाळे, अर्जुन बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)