जुगार अड्ड्यावर छापा दहा जणांना अटक: विशेष पथकाची कारवाई
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अहमदनगर : सावेडी भागात एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार अड्ड्यावर छापा दहा जणांना अटक: विशेष पथकाची कारवाई
अहमदनगर : सावेडी भागात एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.११) रात्री ११ वाजता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा घातला. त्यामध्ये अंबादास सुदर्शन चेन्नूर (वय ३९, रा. दातरंगे मळा), रमेश गोपीनाथ मिसाळ (वय २४, रा. डावरे गल्ली), अनुप श्रीकिरण वर्मा (वय ४१, रा. धरती चौक),भरत गजानन शर्मा (वय ४३, रा. पाईपलाईन रोड),योगेश दत्तात्रय कुलथे (वय ३६, रा. नालबंद खुंट), मधुकर नाथाजी मोहिते (वय ३३, रा.बागरोजा हडको), शिवराम उत्तम भगत (वय ४५, रा.बुर्हाणनगर), बाबासाहेब राम कर्पे( वय ३५, रा.बुरुडगाव रोड), अविनाश गोपीनाथ अनारसे (वय ३८, रा. सारसनगर)असे नऊ जण जुगार खेळताना आढळून आले. हार-जीत अशा प्रकारचा जुगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सावेडी भागातील हनुमंत पार्क अपार्टमेंटमधील रुम क्रमांक १०६ चे घरमालक नामदेव वाकळे यांच्या संमतीने हा जुगार खेळला जात असल्याचे अटक केलेल्यांनी सांगितले. या प्रकरणी वाकळे यांनाही ताब्यात घेतले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांचा पथकामध्ये समावेश होता.जुगार अड्ड्यावर ४२ हजार २१० रुपये रोख रक्कम, २ लाख ३० हजार रुपये किमतीची वाहने आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल २ लाख ७२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या अड्ड्यावर काही प्रतिष्ठितांचे नातेवाईक आहेत. दहा जणांना अटक करून त्यांच्यावर मंुबई जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.