शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उपहार अग्निकांड मालकास १ वर्षाची कैद

By admin | Updated: February 10, 2017 01:06 IST

उपहार अग्निकांडप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास भोगण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बांधकाम व्यावसायिक गोपाल अन्सल यांना दिला

नवी दिल्ली : उपहार अग्निकांडप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास भोगण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बांधकाम व्यावसायिक गोपाल अन्सल यांना दिला. १९९७ मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत ५९ लोकांनी प्राण गमवावे लागले होते. मात्र या दुर्घटनेत मृत्यू पडलेल्यांचे नातेवाईक, जखमी तसेच त्यांचे वकील यांनी या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात तरी आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही, या शब्दांत त्यांनी आजच्या निकालानंतर दु:ख व्यक्त केले. अन्सल बंधूंना किमान जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल, अशी त्या सर्वांची अपेक्षा होती.न्यायालयाने एक वर्षातील उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी चार आठवड्यांत आत्मसमर्पण करा, असे गोपाल यांना सांगितले. २ विरुद्ध १, अशा बहुमताने निकाल देताना न्यायालयाने गोपाल यांचे ज्येष्ठ बंधू सुशील अन्सल यांच्या वयाचा विचार करून त्यांना दिलासा दिला. त्यांनी जेव्हढी शिक्षा भोगली तेव्हढीच शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागणार नाही. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि कुरियन जोसेफ यांनी सुशील आणि गोपाल अन्सल यांना यापूर्वी ठोठावलेला प्रत्येकी ३० कोटींचा दंड अधिक नसल्याचेही निकालात सांगितले. न्यायमूर्ती गोगोई आणि जोसेफ यांनी बहुमताने हा निकाल दिला, तर न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी या निकालाशी असहमती दर्शविली.