शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

मार्क्सवाद्यांचे १ लाख सोशल मीडिया व्हॉलेंटिअर्स तयार

By admin | Updated: February 10, 2016 01:28 IST

पश्चिम बंगालमधे काँग्रेस आणि डावी आघाडी एकीकडे निवडणूकपूर्व युतीसाठी आतूर आहेत तर दुसरीकडे छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसची हडेलहप्पी व दादागिरी

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपश्चिम बंगालमधे काँग्रेस आणि डावी आघाडी एकीकडे निवडणूकपूर्व युतीसाठी आतूर आहेत तर दुसरीकडे छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसची हडेलहप्पी व दादागिरी एक्सपोज करून निवडणूक आयोगाकडे पाठवण्यासाठी खास रणनीती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आखली आहे. आपल्या काडरमधे संपूर्ण राज्यात १ लाख सोशल मीडिया स्वयंसेवक (व्हॉलेंटिअर्स) तयार करण्याचा प्रयोग मार्क्सवाद्यांनी सुरू केला असून तृणमूलचे कार्यकर्ते राज्यात जिथे कुठे अशांतता पसरवण्याचे प्रयोग करतील, त्यावर विनाविलंब कारवाईसाठी छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सव्दारे ही माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल, अशी माहिती दिल्लीतल्या सीपीएम मुख्यालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.पश्चिम बंगालमधे यंदा विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत तृणमूलचे कार्यकर्ते जागोजागी दहशतीचे वातावरण निर्माण करून गोंधळ घालतील. सामान्य मतदारांना भयभीत करतील, असा दाट संशय डाव्या आघाडीच्या नेत्यांना आहे. दहशत आणि दमदाट्यांचे असले प्रयोग, मतदानात अडथळे आणण्याच्या घटना, मतदान अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयोग कुठेही आढळल्यास, डाव्या आघाडीचे जागोजागी विखुरलेले १ लाख स्वयंसेवक (मार्क्सवाद्यांनी त्यांचे नामकरण सोशल मीडिया रिपोर्टर्स असे केले आहे) व्हिडीओ क्लिप्स व छायाचित्रात कैद करतील आणि सोशल मीडियाव्दारे पुराव्यादाखल थेट पक्षाच्या मुख्यालयाकडे पाठवतील. योग्य खातरजमा केल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत त्या घटनांची रितसर तक्रार निवडणूक आयोगाकडे केली जाईल. सीपीएम कार्यालय त्यासाठी एक खास अ‍ॅप तयार करणार आहे. राज्यातली आगामी निवडणूक नि:पक्ष वातावरणात व्हावी, त्यासाठी ही योजना आहे, असे या सूत्रांनी सांगीतले.लोकसभेच्या २0१४ सालच्या निवडणुकीपासून जनमानसावर सोशल मीडियाचा प्रभाव किती वेगाने वाढला, त्याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमधे मार्क्सवाद्यांनी प्रथमच या अस्त्राच्या परिणामकारक वापरासाठी चालवलेली जोरदार तयारी आहे.