शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

०७.... सारांश

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

ग्रामस्थांनी रोखली मुरुमाची वाहतूक

ग्रामस्थांनी रोखली मुरुमाची वाहतूक
रामटेक : तालुक्यातील हमलापुरी परिसरातून मोठ्या प्रमाणात ट्रकद्वारे मुरुमाची वाहतूक केली जाते. त्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी मुरमाचे ट्रक अडविले. महसूल प्रशासनाने या ओव्हरलोड ट्रकवर १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
***
सिर्सी येथे योगसाधना शिबिर
उमरेड : तालुक्यातील सिर्सी येथील रंगनाथबाबा मंदिरात योगसाधना व रोगनिदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंचाय समिती सदस्य सुशीला वानखेडे, सरपंच निकिता चुटे, रामभाऊ नागपुरे, राजू वरघणे आशिष फटिंग उपस्थित होते. योगसाधना शिबिरात परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
***
नाली खोदकामामुळे शेतकरी अडचणीत
सावनेर : सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील वाघोडा परिसरात रोडच्या कडेला नालीचे खोदकाम केले. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या वहिवाटीची व पिकांच्या मशागतीची नवी समस्या निर्माण झाली आहे.
***
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण
मौदा : तालुक्यातील कोदामेंढी - रेवराळ - धानला मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने ते वाहनचालकांच्या नजरेत पडत नाही. त्यामुळे सदर खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
***
कृषिपंपाचे भारनियमन बंद करा
कळमेश्वर : सध्या पावसाने दडी मारल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोटरपंपाद्वारे पिकांना पाणी देत ते वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहे. त्यातच भारनियमन केले जात असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कृषिपंपाचे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
सावरगाव येथे गढूळ पाणीपुरवठा
नरखेड : तालुक्यातील सावरगाव येथे नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, हा प्रकार आठवडाभरापासून सुरू असल्याचे सांगितले. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
***
सर्व्हिस रोडवर साचते पाणी
कोराडी : नागपूर - भोपाळ महामार्गाचे चौपरीकरण करण्यात आले. यात उड्डाणपुलांचे बांधकाम केल असून, सर्व्हिस रोडची निर्मिती केली. या रोडच्यास कडेला नाल्या तयार करण्यात न आल्याने सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
***