०७... कामठी... इसम
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
मालगाडीच्या धडकेत एक ठार
०७... कामठी... इसम
मालगाडीच्या धडकेत एक ठारकामठी : मालगाडीने धडक दिल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी परिसरात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.गौतम वामन गायकवाड (४२, रा. सैलाबनगर, कामठी) असे मृताचे नाव आहे. गौतम हा पायी रेल्वे लाईन ओलांडत होता. दरम्यान, त्याचवेळी नागपूर - हावडा मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीने त्याला उडविले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***