०६... कोराडी
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
(फोटो)
०६... कोराडी
(फोटो)रावसाहेब दानवे यांची कोराडी मंदिराला भेटकोराडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री कोराडी येथील मॉ जगदंबा महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दरम्यान, त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून विविध विकासकामे आणि मास्ट प्लानबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी दानवे यांनी मातेचे दर्शन घेतले आणि दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उभारी देण्याविषयी साकडे घातले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, रवींद्र भुसारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मंदिराच्या गाभाऱ्यात मातेची आरतीही केली. श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचे सचिव केशव फुलझेले यांनी दानवे यांचा सत्कार केला. दानवे यांनी मंदिर परिसराची बारकाईने पाहणी केली. या तीर्थस्थळाचा पर्यटनस्थळाच्यादृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा मास्टर प्लान तयार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. या तीर्थक्षेत्राचा शेगाव व शिर्डीच्या धर्तीवर विकास करण्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महादुला नगरपंचायतच्या अध्यक्ष कांचन कुथे, उपाध्यक्ष राजेश रंगारी, गटानेता राम तोडवाल, कोराडीचे सरपंच चंद्रशेखर बिरखेडे, विलास तभाणे, चंदू टेकाम, अरविंद खोबे, नलिनी धुळस, ज्ञानोबा सोनवणे, पन्नालाल रंगारी, अरुण कुळकर्णी, अजय वाणी, एच.आर. आसरकर, विठ्ठल निमोणे, अरुण उजवणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)**