०६... कामठी... चोरी
By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST
आवंढी येथे घरफोडी
०६... कामठी... चोरी
आवंढी येथे घरफोडीकामठी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी येथे घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी १० हजार २०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. फिर्यादी प्रभाकर महादेव नखाते रा. आवंढी, ता. कामठी हे शेतकरी असून, त्यांचे शेतातच घर आहे. दरम्यान, ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील गॅस सिलिंडर, टीव्ही, शिलाई मशीनसह अन्य साहित्य चोरून नेले. या साहित्याची किंमत १४ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***