०६... कामठी... जोड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
उलट, पदाधिकाऱ्यांमध्ये या अधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूूर उमटला.
०६... कामठी... जोड
उलट, पदाधिकाऱ्यांमध्ये या अधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूूर उमटला. -------चौकट--------१० लाख रुपये मंजूर या पाणीवापर संस्थांच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला होता. या निधीतून ४०० चौरस फूट जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यात आले. वास्तवात सदर बांधकाम एक हजार चौरस फूट जागेवर करावयाचे होते. या इमारतींच्या भिंतीला तडा गेल्या आहेत. त्यामुळे बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला. लोखंड व सिमेंटचा वापर कमी करण्यात आला, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ---------चौकट----मूलभूत सुविधांचा अभाव या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या एका इमारतीमध्ये दोन कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली. या इमारतीच्या समोर रोड तयार करण्यात आला नाही. त्यामुळे इमारतीच्या समोर खड्डे तयार झाले. शिवाय, काही ठिकाणी झुडपेही वाढली आहेत. शिवाय या कार्यालयांमध्ये विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली नाही. जे बांधकाम केले, ते निकृष्ट करण्यात आले. या बांधकामात राखमिश्रीत मातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. ----------चौकट-----कार्यालयाचा फायदा काय?या कार्यालयांचे बांधकाम कामठी - घोरपड मार्गावर करण्यात आले. सदर कार्यालय वडोदा, गुमथळा, नेरी, गादा, घोरपड, लिहिगाव, महालगाव येथून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना कार्यभार पाहण्यासाठी १५ ते २० कि.मी. जावे लागणार असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. शिवाय, पाणी वाटपाच्या नियोजनासाठी शेती व घरगुती कामे सोडवी लागणार असल्याने या कार्यालयाचा फायदा काय, असा प्रतिप्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ***