शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

०६... कामठी... अविश्वास

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

सरपंच बावणे पायउतार

सरपंच बावणे पायउतार
रनाळा ग्रामपंचायत : अविश्वास प्रस्ताव पारित
कामठी : गैरव्यवहाराचा ठपका ठेवत कामठी तालुक्यातील रनाळा येथील सरपंच सीमा सतीश बावणे यांच्या विरोधात सात विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे बावणे यांना अखेर पायउतार व्हावे लागले.
रनाळा ग्रामपंचायतची एकूण सदस्यसंख्या नऊ आहे. यातील सात सदस्यांनी बावणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती.
या बैठकीला सरपंच सीमा बावणे आणि ग्रामपंचायत सदस्य वैशाली उईके अनुपस्थित होत्या. शिवाय, उपसरपंच सुधीर अपाले, ग्रामपंचायत सदस्य नरेश चकोले, अरविंद डोंगरे, शेषराव मोहोड, रंजना वंजारी, अंकिता तळेकर, भारती धानोरकर आदी सात सदस्यांनी सभेला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, या सातही सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सभेला सुरुवात होताच अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात हा प्रस्ताव सात विरुद्ध शून्य मतांनी पारित करण्यात आला.
विकास कामांमध्ये तसेच महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, रनाळा येथील ताजश्री मतिमंद मुलांच्या शाळेला नियमबाह्य पद्धतीने नाहरकत प्रमाणपत्र देणे, ग्रामपंचायतच्या मासिक सभेत चुकीचे ठराव पारित करणे, त्यातून ग्रामपंचायतचे आर्थिक नुकसान करणे, ठराव पारित करताना सदस्यांना विश्वासात न घेणे, विकास कामांची देयके देण्यास टाळाटाळ करणे आदी आरोप करण्यात आले. या ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपमध्ये दोन गट पडले असून, वर्चस्वाच्या लढाईत अविश्वास घेण्यात आल्याची माहिती स्थानिक जाणकारांनी दिली. यासंदर्भात सीमा बावणे म्हणाल्या, या गैरव्यवहाराला आपण एकटे जबाबदार नाही. जेही निर्णय घेण्यात आले, ते सर्वांच्या संमतीने घेण्यात आले. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
***