०६... गुन्हे
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
भरधाव ट्रकने बैलगाडी उडविली
०६... गुन्हे
भरधाव ट्रकने बैलगाडी उडविलीचार जण जखमी : सावंगी शिवारातील घटना नागपूर : भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक देत उडविले. त्यामुळे बैलगाडीने प्रवास करणारे चौघे जखमी झाले. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी शिवारात मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.राजू विश्वनाथ लाजूरकर, (३५), प्रभा राजू लाजूरकर (३५), मंदा बबन कापसे (३५), अर्चना रमेश मदनकर (३२) सर्व रा. सिंदी (रेल्वे), जिल्हा वर्धा अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण बैलगाडीत बसून जात होते. दरम्यान, सावंगी शिवारात भरधाव ट्रकने त्यांच्या बैलगाडीला धडक देत उडविले. यात बैलगाडीतील चौघेही जखमी झाले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मनोहर शामराव मदनकर (४९रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा) यांच्या तक्रारीवरून भादंवि २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाणनागपूर : क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण करून जखमी केल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.सचिन रूपराव गोंडाणे (२६, रा. मासोद) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, प्रतीक रा. मासोद असे आरोपीचे नाव आहे. सचिन हा मासोद येथील चौकात उभा असताना प्रतीकने त्याच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. दरम्यान, त्याने सचिनला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी भादंवि ३२४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***