०२... अपघात
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी
०२... अपघात
दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी नागपूर : परस्पर िवरुद्ध िदशेने येणार्या दोन मोटरसायकलींच्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या वेलतूर - पचखेडी मागार्वर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.प्रकाश लक्ष्मण रोहणकर (२१) व अतुल िकशोर िशवणकर (२५) दोघेही रा. पांढरगोटा, ता. कुही अशी जखमींची नावे आहेत. प्रकाश व अतुल एमएच-३१/बीडी-४५६२ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होते. प्रवीण िवश्वनाथ घोंगडे (३६, रा. नागपूर), धनराज लाडेबा मेश्राम (२५, रा. आकोली, ता. कुही) व आिशष बंडू काटोरे (२२, रा. ममाळणी, ता. कुही) हे ितघेही एमएच-३१/डीसी-१६२३ क्रमांकाच्या मोटरसायकलने िट्रपल िसट िवरुद्ध िदशेने येत होते. दरम्यान, वेलतूर ते पचखेडी मागार्वर या दोन्ही मोटरसायकलींची जोरदार धडक झाली. यात प्रकाश व अतुल दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वेलतूर पोिलसांनी भादंिव २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)***