शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

०९... कोंदामेंढी... रस्ता

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

मार्गाच्या दुरुस्तीला विलंब

मार्गाच्या दुरुस्तीला विलंब
निधी मंजूर : महालगाव परिसरातील रस्त्यांची दैनावस्था
कोदामेंढी : नजीकच्या तोंडली-खिडकी मार्गाच्या डांबरीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, सदर काम एक वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या मौदा तालुक्यातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांपैकी तोंडली ते खिडकी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. सदर काम वर्षभरापासून रखडले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला. तोंडली-धानोली या मार्गाच्या दुरुस्तीसाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यालाही वर्ष लोटले असून, कंत्राटदार सुदीप याने काम सुरू केले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तांडा ते महालगाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या मार्गाच्या कडेला एक ट्रक गिट्टीचे चार ढिगारे टाकण्यात आले असून, त्यात थातूरमातूर काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पिंपळगाव, तांडा व महालगाव येथील ग्रामपंचायतची मासिक सभा नुकतीच पार पडली. त्या सभेत सदर कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे त्या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती. वायगाव-सिरसोली मार्गाच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले असले तरी, त्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या संपूर्ण कामाला सुरुवात करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. करण्यात आलेल्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून आधी चौकशी करण्यात यावी, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना कामाचे देयके अदा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. (वार्ताहर)
***