शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा परिषद करणार औषध खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:41 IST

सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने पावणेतीन कोटी रुपयांची औषध खरेदी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातच मान्सूनचे आगमन झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात साथरोगाचे आव्हानही कायम असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचे ठरविले आहे. या खरेदीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली आहे.

सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. एकीकडे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व दुसरीकडे येऊ घातलेल्या साथरोगाचे संभाव्य आव्हान आरोग्य विभागापुढे ठाकले आहे. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात दूषित पाणी विहिरीत मिसळून ग्रामीण भागात सहा जणांचा बळी तर शेकडोंना साथीच्या रोगाने ग्रासले होते. दरवर्षी दूषित पाणी व बदलेल्या हवामानामुळे साथीचे आजार पसरत असतात. त्यामुळे यंदाचे संभाव्य संकट लक्षात घेता आरोग्य विभागाने पावणेतीन कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाासनाने ठरवून दिलेल्या हाफकिन संस्थेने निश्चित केलेल्या औषधांच्या दरानुसारच ही खरेदी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या खरेदीस मान्यता देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ३३७ औषधांचा समावेश आहे. हे औषधे आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५९२ उपकेंद्रांना पुरविली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद