शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:27 IST

नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

ठळक मुद्देया बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.शिक्षण अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार उच्च प्राथमीक शाळेत विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अहर्ताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशी तरतूद आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विज्ञान विषयाच्या शिक्षकांची ६०० च्या वर पदे रिक्त आहेत. विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यास कार्यरत शिक्षकांमधून जे शिक्षक १२ वी विज्ञान व डीएड असतील अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या जागेवर करण्यात यावी. असा शासनाचा १३ आॅक्टोबर २०१६ चा निर्णय आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मात्र २०१६ पासून कासवगतीने काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २ मार्च रोजी शिक्षकांना समुपदेशनासाठी पत्र काढले; मात्र अवघ्या ३ तासांतच शिक्षण विभागाने ते पत्र रद्द केले. या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ही प्रक्रि या पूर्ण केल्यास उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान पदवीधर शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे, या साठी ही प्रक्रि या आचारसंहीते पूर्वी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शिक्षक व पालकवर्गाकडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या या अजब निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.