शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठ माजी सभापतींना जिल्हा परिषदेचे वेध

By admin | Updated: February 19, 2017 01:25 IST

आठ माजी सभापतींना जिल्हा परिषदेचे वेध

नाशिक : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापतिपद उपभोगलेल्या आजी- माजी पंचायत समिती सभापतींपैकी आठ जणांना मिनी मंत्रालयाचे वेध लागले असून, वेगवेगळ्या तालुक्यांतील पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती विविध गटांमधून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, गावोगावी प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यांच्या माध्यमातून उमेदवार आणि पक्षांचे नेते मतदारांना आपली भूमिका पटवून देत त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत काही गटांमध्ये पंचायत समित्यांचे आजी-माजी सभापती व उपसभापती मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आपले नशीब आजमावित आहेत.  बागलाण तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सीताबाई बागुल वीरगाव गटातून कॉँग्रेसची उमेदवारी करीत आहेत, तर विद्यमान सभापती उषा बच्छाव याही याच राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. कळवण पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड हे कनाशी गटातुन नशीब आजमावत आहेत. सुरगाण्यात माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मंदाकिनी भोये या हट्टी गटातुन माकपच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिंडोरी तालुक्यातील विद्यमान पंचायत समिती सभापती अलका चौधरी या अहिवंतवाडी गटात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, तर माजी सभापती भास्कर भगरे हे खेडगाव गटातून निवडणूक रिंगणात आहेत. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश बरफ ठाणापाडा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. सिन्नरचे माजी सभापती बाळासाहेब वाघ नांदूरशिंगोटे गटातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.