शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:31 IST

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपटनोंदणी पंधरवडा ६ ते १४ वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी उपक्रम

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार असून, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे नियोजन पाठवले आहे. त्यानुसार, ११ जूनला गटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, कें द्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पटनोंदणी पंधरवडा व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आयोजनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाºयांच्या नियुक्त्याही याच दिवशी करण्यात येणार आहेत. १२ जूनला जिल्हास्तरावर संपर्क अधिकाºयांची पटनोंदणी पंधरवड्यात शाळांना भेटी देण्याचे नियोजन भेट पत्राचे वाटप करण्यासोबतच स्थानिक माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.१५ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश खरेदीचा आढावा घेण्यात येणार असून, १५ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्ण मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व गटविकास अधिकाºयांना केल्या आहेत. मुलांना शाळेत आणण्यासाठी देणार दवंडी१३ जून रोजी प्रत्येक शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा होणार असून, १३ ते १६ जून या कालावधीत गावपातळीवर दवंडी देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. १४ जूनला सायंकाळी गावस्तरावर ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सर्व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मशाल फेरीचे आयोजन करणे, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.