शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा आजपासून सकाळच्या सत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:50 IST

जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देशिक्षकांचे लाइव्ह लोकेशन घेण्याचे निर्देश

नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारपासून (दि.११) जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी ७.५० ते दुपारी १.१५ या वेळेत भरणार असून, शिक्षक वेळेत शाळेत उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांचे लाइव्ह लोकेशन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने वातावरणात बदलाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत उष्णता वाढली आहे. या परिस्थितीचा विचार करून शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. काही शिक्षक संघटनांनी व सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ११ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळा आता सोमवार ते गुरुवार सकाळी ७.५० ते १.१५, शुक्रवारी सकाळी ७.५० ते १.०५ तर शनिवारी ७.५० ते १२.०५ या वेळेत भरणार आहेत.शासन निर्णयानुसार विद्यार्थी गेल्यानंतरही शिक्षकांनी शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पुढील अडीच तास शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शिक्षक वेळेवर हजर राहिले नाही, किंवा वेळेच्या आत शाळा सोडून गेले तर त्यांची त्या दिवसाची अनधिकृत गैरहजेरी लावण्यात येणार असून, याकामी सरपंच, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षणप्रेमी यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बदल करण्यात आला आहे. मात्र तासिकेत बदल झालेला नाही अशी माहिती शिक्षण अधिकारी वैशाली झणकर यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा