शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यास अटक : चौंधाणे-जोरण रस्त्यावरील घटना भरधाव वाहनाने शिक्षकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या भरधाव मोटारीने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत शिक्षक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देमद्यधुंद अवस्थेत असल्यामुळेच दुर्घटना अहिरे यांच्या मोटारकारने धडक तत्काळ अटक करण्याची मागणी

सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या भरधाव मोटारीने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चौंधाणे-जोरण रस्त्यावर घडली. दरम्यान, अहिरे मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर सटाणा पोलिसांनी अहिरे यांना अटक करून गुन्हा दाखल केला.जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वत:च्या ब्रीझा मोटार कारने (क्र. एमएच १२ एनपी ६४५०) पठावेकडून जोरणमार्गे सटाण्याकडे येत होते. भरधाव वेगाने मोटारकार जात असताना चौंधाणे-जोरण रस्त्यावरील चिंचपाटीनजीक शिक्षक समाधान वसंत वाघ (२७), रा. निकवेल हे आपल्या शेतातून जोरण रस्त्याकडे येत असताना अहिरे यांच्या मोटारकारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. वाघ यांना जखमी अवस्थेत उचलून अहिरे यांनी स्वत: उपचारार्थ ग्रामीण रु ग्णालयात भरती केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला. वाघ यांच्या अपघाती निधनाची वार्ता पसरताच निकवेल येथील ग्रामस्थांची येथील ग्रामीण रुग्णालय आवारात गर्दी उसळली होती. यावेळी संतप्त नातेवाइकांनी वाघ यांच्या मृत्यूला जिल्हा परिषद सदस्य अहिरे यांना जबाबदार धरले. अहिरे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून, त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाइकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अहिरे यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा अहिरे यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.