शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद : सुकदेव बनकरांचा वावरही खूपतोय मीणांना खटकतोय झगडे यांचा हस्तक्षेप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:57 IST

नाशिक : आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली झाडाझडती आणि बनकर यांनी केलेली दप्तर तपासणी दीपककुमार मीणा आणि त्यांच्या समर्थकांना खटकली असल्यानेच पक्षपातीपणाचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देपाठीशी घालत असल्याचा आरोपआमदाराशी निर्माण केलेली जवळिक

नाशिक : विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली झाडाझडती आणि उपायुक्त सुकदेव बनकर यांनी जिल्हा परिषदेत केलेली दप्तर तपासणी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा आणि त्यांच्या समर्थकांना खटकली असल्यानेच आता या दोघांवर पक्षपातीपणाचा आरोप होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. खुलेपणाने याबाबत स्पष्ट कुणीही बोलत नसले तरी मीणा यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी झगडे काही अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत असलेला मीणा वाद आता आयएएस अधिकाºयांमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या कारवायांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, त्यात अधिकाºयांपासून आमदारासारखे दिग्गज लोकही भरडले गेले आहेत. मीणा उघडपणाने कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे त्यांची मूळ भूमिका समोर येऊ शकलेली नाही. आदिवासी आमदारांशी त्यांची झालेली चर्चा, विभागीय आयुक्तांबरोबरच्या बैठका, ग्रामसेवकांसंदर्भातील बदलेली भूमिका आणि शहरातील एका आमदाराशी निर्माण केलेली जवळिक यामुळे मीणा यांचे मनसुबे अद्यापही उघड झालेले नाहीत. मात्र केवळ त्यांच्या नावाभोवतीच जिल्ह्णातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातून नेमके त्यांना काय साध्य करायचे आहे याचा उलगडा मात्र अजूनही होत नाही. मीणा हे आदिवासी भागासाठी चांगले काम करीत असल्याने त्यांना रोखण्यासाठी ग्रामसेवकांनी असहकार पुकारल्याचा आरोप करीत आदिवासी कोळी महादेव विकास संघटनेने ग्रामसेवकांना उघड आव्हान दिले होते. दुसरीकडे मीणा यांनी ग्रामसेवकांशी जुळवून त्यांच्या विरोधातील आंदोलनाची धार कमी करण्यात यश मिळविले आहे. आता तर आदिवासी संघटनेने तर विभागीय आयुक्त महेश झगडे आणि उपायुक्त सुखदेव बनकर यांच्या चौकशीची मागणी करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र धाडले असतानाही मीणा यांनी आपल्याच अधिकाºयांविरोधातील पत्रव्यवहारावर सोयीस्कर मौन बाळगल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वास्तविक मीणा यांच्या प्रकरणावरूनच झगडे, बनकर यांना या वादात ओढले जात असल्याचे स्पष्ट दिसत असताना मीणा यांनी मात्र हा समज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मीणा यांना नेमके हवे तरी काय? हा प्रश्न येथील अधिकाºयांना अस्वस्थ करीत आहे.अधिकाºयांवर नजरजिल्हा परिषदेतील काही अधिकारी बनकर यांच्या काळात रिजेक्ट झालेल्या फाइल्स मीणा यांच्याकडून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा मीणा यांंना संशय असल्यानेच अधिकारी आणि मीणा यांच्यातील दुरावा वाढत असल्याची चर्चा आहे. आदिवासी कोळी संघटनेच्या निवेदनावरून तरी या गोष्टीला दुजोरा मिळाल्यासारखाच आहे. मीणा हे आदिवासींसाठी उपाययोजना राबवित असल्यानेच त्यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा गेल्याचा आरोप खासगीत केला जात आहे, तर मीणा यांचे मौनही सूचक मानले जात आहे.