शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

जिल्हा बॅँकेला जिल्हा परिषदेकडून अभय?

By admin | Updated: June 14, 2017 00:06 IST

जिल्हा बॅँकेला जिल्हा परिषदेकडून अभय?

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेचे सुमारे २६७ कोटींचे धनादेश वटत नसल्याने सोमवारी (दि. १२) बोलविण्यात आलेल्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला कायदेशीर नोटीस बजावण्याचा झालेला निर्णय कागदावरच राहिल्याचे वृत्त आहे.दरम्यान, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याबाबत अजूनही ‘विचार’ सुरू असल्याचे स्पष्टीकरण संबंधित विभागाकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेला शासनाकडून व जिल्हा नियोजन मंडळाकडून वेळोवेळी विकासकामांसाठी तसेच पोषण आहार, शिक्षक वेतन यासह अन्य कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे २६७ कोटींचे धनादेश वटत नसल्याची कबुली दुसरी तिसरे कोणी नव्हे तर जिल्हा बॅँकेचे मुख्य लेखाधिकारी शैलेश पिंगळे यांनी सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी बोलविलेल्या बैठकीत दिली होती. याच बैठकीस उपस्थित असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे यांनी जिल्हा बॅँकेला निधी परस्पर वापरून फसवणूक केल्याच्या कारणावरून कायदेशीर नोटीस बजावण्याचे सूचित केले होते. प्रत्यक्षात मंगळवारी (दि. १३) यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागार मंडळातील संबंधित कायदेशीर तज्ज्ञांचे मार्गदर्शन न आल्याचे कारण देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला कोणतीही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे एकीकडे कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेले बेरोजगार अभियंते व मजूर संस्था संचालक जिल्हा परिषदेच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून जिल्हा बॅँकेवर केवळ कायदेशीर कारवाईचा फार्स करण्यात येत असल्याचे चित्र होते.