शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर हुसेन रुग्णालयात टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या ...

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दोन पर्यायी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

गेल्या बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी ऑक्सिजन रिफिल करताना गळती झाल्याने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि तत्काळ २२ तर नंतर आणखी दोन अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, गेल्या ३१ मार्च रोजीच बसण्यात आलेल्या या टाकीच्या व्हॉल्व्ह अवघ्या २१ दिवसांत निकामी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते, तर टाकी बसवण्याबरोबरच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराचे अधिकारी तब्बल ४८ तासांनी दाखल झाले होते.

महापालिकेने पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनला काम दिले असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञ न ठेवल्याने महापालिकेला अन्य खासगी पुरवठादारांकडून तंत्रज्ञ मागवून दुरुस्ती करावी लागली होती. कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी त्यांना टाकीची दुरुस्ती करण्याबरोबच तंत्रज्ञ नियुक्त करण्यास सांगितले होते. त्यानुसार कंपनीने काम सुरू केले आहे. त्यासाठी खास पुण्याहून तंत्रज्ञांचे पथक दाखल झाले आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी रविवारी (दि.२५) एकेक किलो लिटर्सच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने १०६ लहान-मोठे सिलिंडर्स आणून ठेवले आहेत.

इन्फो...

टाकीच्या दुरुस्तीआधी तात्पुरत्या स्वरूपात दोन नव्या छोट्या टाक्या बसवल्या आहेत. त्यातून रुग्णालयात पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुख्य टाकीतील पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत नव्या टाकीच्या दुरस्तीचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.