शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत युवकांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:15 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ११२ सदस्यपदासह २४ थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी ३० पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून पाच जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आलेले आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ११२ सदस्यपदासह २४ थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी ३० पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून पाच जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आलेले आहेत. सर्व ग्रामपंचायतींत प्रथमच सरपंचपदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काही दिग्गजांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. निकालानंतर कोठेही काही अनुचित घटना घडली नाही. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याने आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंच पदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभारात राजकीय रणकंदन अपेक्षति असले तरी मात्र सर्वत्र यशाचा जोरदार जल्लोष सुरू आहे.इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.------------------------समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निवडअधरवड येथील उमेश बर्हे, नवनाथ बर्हे यांना प्रत्येकी १८६ समान मते मिळाली. तर म्हसुर्ली येथील योगिता तांबे, पार्वताबाई भारस्कर यांनाही १६४ समान मते मिळाली. सोनोशी येथील माधवराव घाणे, दत्तू पेढेकर यांना समान ९४ मते मिळाली. यामुळे तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या दालनात सर्वांच्या उपस्थितीत रसिका बोंडे, सई बºहे या मुलींनी चिठ्ठी काढली. यामध्ये अधरवड येथील उमेश बºहे यांची, म्हसुर्ली येथील योगिता तांबे, सोनोशी येथील दत्तू पेढेकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. पाडळी देशमुख येथील पूजा धांडे ह्या दोन ठिकाणी उभ्या होत्या. एका ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. थेट सरपंच पदांमुळे सदस्यांतून सरपंच होण्याचे स्वप्न धुळीला मिळालेल्या विजयी उमेदवारांनी उपसरपंच होण्यासाठी नव्या सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी योजना सुरू केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक