शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

युवकांनी गावांचा कायापालट करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:21 IST

दिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देअजित पवार : वरखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बहुमजली इमारतीचे उद्घाटन

poliलोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वरखेडा येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आदी विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र उफाडे यांच्या कामकाजाचे कौतुक करून गावात ग्रामविकासासाठी २५ लाखांचा निधी देत असल्याचे जाहीर केले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, हे सरकार जनतेचे असून, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांचा समान विकास साधणार आहे. ग्रामपंचायती बळकट करणार असून चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्राम विकास चांगला होणार आहे. भाजपच्या काळात १७ रुपयांचे दूध होते ते आता ३१ रुपये केले. मालेगावात झालेली दुर्घटना अत्यंत वाईट आहे, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे २६ लोकांना जीव गमवावा लागला. यामुळे योग्य पद्धतीने व संयमाने जीवन जगावे, तरुण समाज चांगला तयार व्हायला पाहिजे, साधू संतांचा आदर्श ठेवून वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनीकेले.आमदार नरहरी झिरवाळ यांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार उत्तम भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिप सदस्य भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, सदाशिव शेळके, संजय पडोळ, वरखेडा सरपंच जयश्री कडाळे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल...अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे सूट कोट व फेटा घालून होते, यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल तेवढा नटला... मी बघा किती साध्या ड्रेसवर असे म्हणत फिरकी घेतली. या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजनही अजित पवार यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी राजेंद्र उफाडे यांनी ब्रेसलेट घातले होते तेव्हाही त्यांना टोमणा मारत साधं राहण्याचा सल्ला दिला होता.झरवाळांवर मोठी जबाबदारीआमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद द्यावे ही सर्वांची अपेक्षा होती पण तीन पक्षाचे सरकार आले, त्यामुळे मर्यादा आल्या. तरी चिंता करू नका, भविष्यात लवकरच नरहरी झिरवाळ यांच्यावर मोठी जबादारी देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.अजित पवार यांचे दिंडोरी व परमोरी येथे स्वागत निवेदनशुक्रवारी सकाळी दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजितदादा पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दिंडोरी येथे नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी स्वागत करीत विविध मागण्यांचे निवेदन दिले.परमोरी येथेही रोशन दिघे, अनिल दिघे, राकेश दिघे, विजय दिघे, हेमंत दिघे, नीलेश दिघे व आदींनी त्यांचे स्वागत करीत ग्रामपंचायतीतर्फेमागण्यांचे निवेदन दिले. पवार यांनी स्वागत स्वीकारत आस्थेवाईकपणे चर्चा करीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण