शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ताई बामणेला यूथ आॅलिम्पिकचे तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:10 IST

नाशिक : बॅँकॉक (थाइलॅँड) येथे सुरू असलेल्या यूथ एशियन अ‍ॅथलेटिक्स पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची अव्वल धावपटू १५ वर्षीय ताई बामणेने मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मि. २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही कामगिरी करताना ताईने अर्जेंटिना येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केली आहे.

ठळक मुद्देयुथ एशियन निवड चाचणी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ४:२५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून जिंकले रौप्य

नाशिक : बॅँकॉक (थाइलॅँड) येथे सुरू असलेल्या यूथ एशियन अ‍ॅथलेटिक्स पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची अव्वल धावपटू १५ वर्षीय ताई बामणेने मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मि. २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही कामगिरी करताना ताईने अर्जेंटिना येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केली आहे.युथ आॅलिम्पिकसाठी ही स्पर्धा महत्वाची असल्यामुळे भारताचे सर्वच धावपटू आपले सर्वस्व पणाला लावून उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या तयारी होते. मुलींची मध्यम पल्लयाची १५०० मीटर धावण्याची शर्यतीकडे महाराष्टÑाच्या तमाम अ‍ॅथलेटिक्स खेळाडू आणि प्रेमींचे लक्ष लागून होते कारण या शर्यती नाशिकची ताई बामणे धावणार होती. ताई बरोबर जपान आणि चीनच्या धावपटू प्रतिस्पर्धी होत्या त्यामुळे शर्यत चुरशीची होणार हे निश्चित होते. शर्यत सुरू झाल्यानंतर जपानची युूकी कानेमिथसू, चीनची गुईपीन झेंग आणि ताई बामणे या एका मागोमाग होत्या. पहिल्या दोन फेऱ्या झाल्यानंतर जपानच्या युकीने ताईला थोडे मागे टाकले. त्यावेळी चीनची गुईपीन ताईचा पाठलाग करीत होती. या तिघींमध्ये जास्त अंतर नव्हते. शेवटीचे दोनशे मीटर बाकी असताना जपानची यूकीने आपला वेग वाढविला, त्याच वेळी ताईने सुध्दा तीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पण युकी एवढी पुढे गेहली होती की ताईला तीला गाठण्यात अपयश आले. युकीने ४ मिनिट २४.२१ सेकंदात तर ताईने ४ मिनिट २५.६६ सेकंदात शर्यत पूर्ण करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. चीनच्या गुईपीन झेंगला (४ मि. ३०.४५ से.ं) कास्यपदकावर समाधान मानवे लागले.या शर्यतीत ताई आल्या कारर्किदीतील सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविली होती. एप्रिल महिन्यात झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंकड स्पर्धेत ताईने ४ मि. ३६.६१ सेकंदाची वेळ नोंदविली होती. महत्वाचे म्हणजे या शर्यतीतील पहिल्या तिन्ही धावपटूंनीअर्जेंटीना युथ आॅलिम्पिक( ४ मि. ३६.९४ से.ं) स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली होती. खेलो इंडियात प्रथमकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे ८०० मीटरमध्ये नाशिकची उदयोन्मुख धावपटू ताई बामणे हिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक पटकावले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून ताईने महाराष्ट्रासाठी पदक जिंकले होते.