शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदेश्वरी घाटात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:13 IST

नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसीन व त्याचे वडील शब्बीर (६५) कासारीनजीक चांदेश्वरी घाटातून जात असताना, शब्बीर लघुशंकेसाठी खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देचाकूहल्ला : अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू

नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसीन व त्याचे वडील शब्बीर (६५) कासारीनजीक चांदेश्वरी घाटातून जात असताना, शब्बीर लघुशंकेसाठी खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.छातीवर व गळ्यावर धारदार शस्त्रामुळे मोठ्या जखमा झाल्याने रक्तस्त्राव होऊन मोहसीनचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी शब्बीर पठाण यांनी घर दुरुस्तीला काढले. तेव्हा शेजारी कादर रहिमतुल्ला व शब्बीर यांच्यात ओट्यावर बसून मोठ्या आवाजात वाद चालला आहे, असे वाटल्याने कादर यांच्या मुलांनी मोहसीन याच्या डोक्यावर लाकूड मारले होते. त्यात तो जखमी झाला होता. औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार होऊन कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर मोहसीन याच्या आईला शेजारच्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे मंगळवारी नांदगाव पोलिसांत तक्र ार दाखल करण्यासाठी मोहसीन व त्याचे वडील आले होते. ते परत जात असताना सदर घटना घडली.