बिजोरसे : मुल्हेर ते अंतापूरदरम्यान पिकअपने (एमएच ०४, ३०२१) दुचाकीला (एमएच ४१, एडी ७४६३) धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुुचाकीचालक श्यामकांत रामचंद्र सावंत जागीच ठार झाले, तर समाधान शांताराम भामरे हे जखमी झाले. जखमीला नामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर येथील श्यामकांत सावंत (४७) व समाधान भामरे (२९) हे दोघे हरणबारी धरणावर पाणीसाठा बघण्यासाठी दुपारी ३ वाजेच्यादरम्यान घरातून निघाले होते. धरणाचा पाणीसाठा बघून परत येत असताना सदर अपघात झाला़ संजय खैरनार, रा. अंतापूर यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)
मोटारसायकल-पिकअप अपघातात युवक ठार
By admin | Updated: August 15, 2016 00:02 IST