नाशिक : रस्त्याने पायी जात असताना मोबाइलवर बोलत चाललेल्या युवतीचा मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१९) सायंकाळी आकाशवाणी भाजीमार्केट परिसरात घडली़ सावरकरनगरमधील अनंत बंगल्यातील प्रज्ञा अशोक मोरे या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आकाशवाणीजवळील भाजीमार्केट परिसरातून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी मोरे यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल खेचून नेला़ मोरे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तरुणीचा मोबाइल खेचून चोरटा फरार
By admin | Updated: December 21, 2015 23:23 IST