शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार न झाल्याने युवतीचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:33 IST

रस्ताच नसल्याने वेळेत उपचाराअभावी जीवाला मुकावे लागल्याची दुदैवी घटना

ठळक मुद्देककीताला गावातून डोली करुन दवाखान्यात पोहोचविण्यात आले

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथे सर्पदंश झालेल्या युवतीला रुग्णालयात नेण्यासाठी गावातून रस्ताच नसल्याने वेळेत उपचाराअभावी जीवाला मुकावे लागल्याची दुदैवी घटना घडली आहे. हेदपाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली असली तरी अद्याप कामाला सुरुवात होत नसल्याने गावकऱ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत असल्याचे विषण्ण करणारे चित्र समोर आले आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाड येथील कु. ककीता गणपत किलबिले (१८) ही युवती शेती कामासाठी घराबाहेरीलच रानात गेली होती. यावेळी शेतीकाम करत असतानाच ककीताला सर्पदंश झाला. ककीताला साप चावल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांनी धावपळ करत १०८ क्रमांकावर संपर्क साधून रूग्णवाहिका पाठविण्यासाठी कळविले. परंतु, हेदपाडा गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका निम्म्या रस्त्यावरच येऊन थांबली. त्यामुळे ककीताला गावातून डोली करुन दवाखान्यात पोहोचविण्यात आले. परंतु, दवाखान्यात नेईपर्यंत ककीताची प्राणज्योत रस्त्यातच मालवली. वेळेत उपचार न मिळाल्याने ककीताचा दुदैवी अंत झाला. हेदपाडा गावापर्यंत रस्ताच नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हाल होत असते. लोकप्रतिनिधींचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकsnakeसाप