शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तरु णांनी केला वानराचा दशक्रि या विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:01 IST

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला.

ठळक मुद्देपाथरे : भूतदयेचे दर्शन; पोलिसांकडून घेतली परवानगी

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला.हनुमान जयंतीच्या दिवशी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. रस्ता ओलांडत असतना अज्ञात वाहनाची धडक लागून त्यातील एक वानर ठार झाले होते. या वानराचा मृतदेह गावात आणून गावकऱ्यांनी हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत दफन विधी केला.वानराचा दशक्रिया विधी करण्याचे काही तरुणांनी ठरवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन मोजकेच तरुण या विधीसाठी उपस्थित होते. यावेळी जमावबंदी आदेशाचे पालनही करण्यात आले. दशक्रि या विधीसाठी वावी पोलीस स्टेशनकडून परवानगी घेतल्याची माहिती उपसरपंच सुखदेव गुंजाळ यांनी दिली.योगेश घुमरे, दत्तू गुंजाळ, दत्ता चतुर, विलास डोंगरे, अनिल बैरागी, अमोल घोलप, भीमाजी पवार, दत्तू चिने यांनी सहकार्य केले. काही तरुणांनी विधिवत पूजन करून मुंडणही केले. गणेश पाटील यांनी पौरोहित्य केले. या वानराचे मंदिर बांधण्याचे गावकऱ्यांनी ठरविले आहे.हनुमान जयंतीला वानरांचा समूह गावात आल्याने प्रत्यक्ष हनुमंताने दर्शन दिले अशी ग्रामस्थांची भावना झाली. त्यामुळे गावातील काही तरु णांनी या वानराचा दशक्रि या विधी करण्याचे ठरवले. त्यानुसार मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत रविवारी (दि.१९) विधिवत पूजन करून वानराचा दशक्रि या विधी पार पडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य