शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मांगीतुंगी येथे पिकअपखाली चेंगरून तरुण ठार

By admin | Updated: May 11, 2017 00:53 IST

सटाणा : मांगीतुंगी देवस्थान मालकीच्या पिकअपखाली चेंगरून मोटर-सायकलस्वार जागीच ठार झाला,तर दुसरा तरु ण गंभीर जखमी झाला

 लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : मांगीतुंगी देवस्थान मालकीच्या पिकअपखाली चेंगरून मोटर-सायकलस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा तरु ण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना भिलवाड ते मांगीतुंगी पर्वतमार्गावर बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे गरीब आदिवासी युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संतप्त भिलवाडच्या आदिवासी महिला व पुरु षांनी तब्बल चार तास मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता.बागलाण तालुक्यातील भिलवाड येथील सुरेश दयाराम माळी (२६), विनोद चुनीलाल सोनवणे (२७) हे दोघे मित्र कामानिमित्त बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच ४१ टी ५५६३) मांगीतुंगी पर्वतमार्गाकडे जात होते त्या वेळी असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे पीकप व्हॅन (एमएच ४१ . ५१०८) खाली सापडून सुरेश माळी याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर विनोद सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. ठाकूरवाड यांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र भिलवाडचे ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर मांगीतुंगी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिसांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेशच्या तीन मुलांच्या संगोपनाबरोबरच जखमी विनोदच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी उचलण्याची हमी दिल्यानंतर नातेवाइकांनी चार तासांनी सुरेशचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.