मालेगाव मध्य : शहरालगतच्या गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेत वसीमखान इस्माईल खान (४०, रा. नुमानीनगर) या यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली आहे. मनपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह शोधला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसीम खान हा मूळचा सुरतचा असून मालेगावी स्थायिक झाला होता. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे जवान शकील अहमद व सहकाऱ्यांनी शोध घेत मृतदेह बाहेर काढला. सामाजिक कार्यकर्ते मोहंमद शफीक अॅण्टिकरप्शन यांनी सोशल मीडियावरून मयताचे फोटो व्हायरल केल्याने नातलगांनी सामान्य रुग्णालय गाठले. वसीम खानच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.
नदीत उडी घेत तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST