शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून करंजाड येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:01 IST

जायखेडा : शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या विवंचनात सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (२८) याने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविली.

ठळक मुद्देपैसे फेडावे तरी कसे या विवंचनेतुनच एकनाथची विष प्राशन करून आत्महत्या

जायखेडा : शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या विवंचनात सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (२८) याने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविली.सकाळपासून तोे घरातून बेपत्ता होता. त्यांच्या आई सरूबाई चित्ते या सायंकाळी त्यालाना शेतात शोधण्यासाठी गेल्या असता एकनाथ शेतात बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी त्वरीत आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. असता पोलिस पाटील प्रवीण देवरे व सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे, दिपक वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेतली, व त्याला तातडीने सटाणा ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादम्यान त्याची प्राणज्योत मालवली.जवळपास दोन एकर शेती त्याच्या वडीलांच्या नावे असून सहकारी सोसायटीचे व देना बँकेचे सव्वा लाखाच्या आसपास कर्ज आहे. तसेच काही हात उसनवार पैसे घेतले आहेत. हे पैसे फेडावे तरी कसे या विवंचनेतुनच एकनाथने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.विभागीय पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे, तहसीलदार प्रमोद हिले यांनी घटनास्थळी भेट देऊन चित्ते कुटुंबियांचे सांत्वन केले. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोये पुढील तपास करीत आहेत. एकनाथ यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे.(फोटो २४ एकनाथ चित्ते)