शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

गुरुजी तुम्हीसुद्धा!

By किरण अग्रवाल | Updated: September 2, 2018 01:11 IST

समाजाचे मार्गदर्शक म्हणविणाऱ्या स्तंभात गुरुजनांचा क्रम नेहमी अव्वल राहिला असला तरी, त्यातील काही अपवादात्मक घटकांमुळे या आदरप्राप्त क्षेत्रालाही नख लागण्याचे प्रकार अलीकडे वरचेवर समोर येत आहे, हे दुर्दैवीच म्हणायला हवे. स्वत:च्या सोयी-सुविधाजनक बदलीसाठी जिल्हा परिषद यंत्रणेला खोटी वा चुकीची माहिती पुरविणाºया शिक्षकांचे जे प्रकरण नाशकात पुढे आले आहे तेदेखील याच अपवादात मोडणारे आहे.

ठळक मुद्दे दुसरीकडे काही जणांच्या वेतनवाढी बंद करण्याची वेळ ओढवावी, हे शोचनीयच ठरावे.

समाजाचे मार्गदर्शक म्हणविणाऱ्या स्तंभात गुरुजनांचा क्रम नेहमी अव्वल राहिला असला तरी, त्यातील काही अपवादात्मक घटकांमुळे या आदरप्राप्त क्षेत्रालाही नख लागण्याचे प्रकार अलीकडे वरचेवर समोर येत आहे, हे दुर्दैवीच म्हणायला हवे. स्वत:च्या सोयी-सुविधाजनक बदलीसाठी जिल्हा परिषद यंत्रणेला खोटी वा चुकीची माहिती पुरविणाºया शिक्षकांचे जे प्रकरण नाशकात पुढे आले आहे तेदेखील याच अपवादात मोडणारे आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत स्वत:ची सोयीच्या ठिकाणी वर्णी लावून घेण्यासाठी काहींनी खोटी माहिती भरून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यासंबंधित सुमारे २०० शिक्षकांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेऊन त्यात दोषी आढळलेल्या ९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, संबंधिताना पुढील बदलीप्रक्रियेत विकल्प दिला जाणार नसून अवघड म्हणजे दुर्गम भागात त्यांची बदली केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील जवळपास सर्वच विभागातील अनागोंदी हा नेहमीच टीकेचा विषय ठरत आला आहे. शिक्षक बदल्यांचा विषयही दरवर्षीच गाजत असतो; परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ‘मिलीभगता’तून काहींना लाभदायक तर काहींसाठी त्रासदायक ठरणाºया बदल्या होत असण्याची ती तक्रार असे. यंदा मात्र शिक्षकांनीच खोटी माहिती पुरवून प्रशासन यंत्रणेची दिशाभूल केल्याचे पुढे आले. असले प्रकार हे अपवादात्मकतेत मोडणारे असतात हे खरे; पण त्यामुळे एकूणच समाजाचा दृष्टिकोन बदलू पाहण्याची भीती असते. मागे मालेगाव महापालिकेत जीवन सोनवणे आयुक्तपदी असताना त्यांनी तेथील सर्वशिक्षा अभियानाच्या योजनेत गोंधळ घालणाºयांना हुडकून काढले होते. शासनाचा निधी लाटून प्रत्यक्षात वर्गखोल्याच बांधल्या नसल्याचे त्यावेळी आढळून आल्याने काही मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरुजनांच्या प्रतिमेवर ओरखडा ओढणारे हे प्रकार आहेत. तेव्हा अशा गोंधळींना वेळीच वठणीवर आणणे हे केवळ प्रशासन म्हणून यंत्रणांचेच काम नाही, तर शिक्षक संघटनांनीदेखील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्थाबिकट असताना शिक्षकवर्ग ज्ञानार्जनासाठी परिश्रम घेताना दिसतो. खासगी शाळांचे वाढते प्रस्थपाहता जि.प.च्या शाळांसाठी विद्यार्थी मिळविण्यापासून तर ते टिकविण्यापर्यंतचे व्यवस्थापन त्यांना सांभाळावे लागते. ते करताना विद्यार्थी घडवायचे आव्हान सोपे नाही. पण शिक्षकी पेशातील सेवाभाव टिकून असल्याने यंदा जिल्ह्यातील सात शिक्षकांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाले आहेत. असे एकीकडे अभिनंदनीय आदर्श समोर येत असताना दुसरीकडे काही जणांच्या वेतनवाढी बंद करण्याची वेळ ओढवावी, हे शोचनीयच ठरावे.