शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाथ संप्रदायातील योगी ज्ञाननाथ रानडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:00 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी (दि.२४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. पुण्यासह नाशिक, मुंबई परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.

नाशिक : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी (दि.२४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. पुण्यासह नाशिक, मुंबई परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.ज्ञाननाथजी मूळचे नाशिकचे. ५ सप्टेंबर १९२४ रोजी त्यांचा जन्म नाशिकला झाला. त्यांचे मूळ नाव बापू नारायण रानडे. शंकर महाराजांचे सान्निध्य त्यांना बालपणापासून लाभले. योगी हरिनाथजी यांच्याकडून त्यांना त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात वयाच्या १८ व्या वर्षी पूर्ण नाथदीक्षा प्राप्त झाली होती. त्यानंतर पुढे पन्नास वर्षे त्यांनी शहर व ग्रामीण भागात कीर्तनसेवा, निर्गुण भजन सेवा केली. श्रीज्ञानेश्वरी सप्तजन्म शताब्दी वर्षात त्यांनी वर्षभर आळंदीत वास्तव्य केले होते. त्यांनी लिहिलेली जंगली महाराज ऊर्फ जागरनाथ, हरिनाथबाबा, मी पाहिलेले शंकर महाराज, गोविंदकाका उपळेकर, दादा महाराज सातारकर, जोगन विठामाई, विश्वनाथ महाराज रुकडीकर ही चरित्रे प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रांतून नाथपरंपरेवर विपुल लेखन केले. पंढरपूर वारी सुरू झाल्यानंतर ‘मनोमय वारी’ हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.