शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

येवलेकरांचा घसा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:15 IST

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : चार दिवसांआड १५ मिनिटे अशुद्ध पाणीपुरवठा

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.सोमवारी तर मध्यवस्तीसह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आवर्तन मिळण्यासाठी कागदोपत्री श्रेयवादाचेही प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ मार्चला आवर्तन सोडणार असल्याचे लेखी आश्वासनदेखील मिळाले. अद्यापपावेतो पाणी आलेच नाही. आता १० मार्चच्या पुढे पाणी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता ५० दलघफुटाची आहे. परंतु वारेमाप अनधिकृत पाणी उपसा आणि अयोग्य वितरण व्यवस्था यामुळे चार योजना राबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच राहत असल्याचा टाहो अनेकदा फोडला जातो. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला पत्राद्वारे कळविले. पण पाणी आवर्तन सुटलेच नाही. आणखी किमान १५ ते २० दिवसांनी आवर्तन सुटणार असल्याची चर्चा आहे. आणखी काही दिवस येवलेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती दिसत आहे. पालिकेच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याचेही कोणाला सोयरसुतक नाही. पाणीटंचाई सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.२०० विहिरीतून पाण्याचा उपसापालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफूट पाणी मार्चअखेर पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायलाच हवे. पण पाच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी संपुष्टात येते. हे नेमके गणित कायम बिघडले आणि ते कुठे बिघडते. हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी पाच दिवसाआड पाणी मिळते. खासगी पाण्याचे टँकर राजकीय वरदहस्ताने साठवण तलावालगतच्या विहिरीवरून सर्रासपणे भरले जात असल्याची चर्चा आहे. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा, पालिकेचे पाणीवाटपाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात पाणीटंचाई आहे.