शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून शहरात नवरात्रीची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:56 IST

नवरात्रोत्सव : बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाचेही आयोजन नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुरुवार (दि. २१) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी, भद्रकाली देवी मंदिर, तसेच सांडव्यावरची देवी आदि मंदिरांसह शहरातील विविध देवी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडूनही दांडिया आणि गरब्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नवरात्रोत्सव : बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाचेही आयोजन

नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुरुवार (दि. २१) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी, भद्रकाली देवी मंदिर, तसेच सांडव्यावरची देवी आदि मंदिरांसह शहरातील विविध देवी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडूनही दांडिया आणि गरब्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.पितृपक्षानंतर सुरू होणाºया नवरात्रोत्सवाला मंदी असलेल्या बाजारपेठेत उत्साह संचारणारआहे.या उत्सवकाळात नाशिकची ग्राम देवता म्हणून ओळखल्या जाणाºया कालिका देवी यात्रेसाठीची तयारीदेखील पूर्ण झाली असल्याची माहिती कालिका देवी मंदिर ट्रस्टने दिली असून, या भागात रहाट-पाळण्यांसह विविध प्रकारच्या खेळणी व पूजा साहित्यांची दुकाने लावण्यात येणार आहे. यावर्षी शुक्रवारी (दि. २९) नवरात्रोत्सवाची सांगता होणार असून, शनिवारी (दि. ३०) दसºयाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.नवरात्रोत्सव काळात गंगापूर धबधब्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिर येथे गुरुवार (दि. १९) सप्टेंबर ते दि. ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘ब्रह्मोत्सवा’चे देखील आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार (दि. २१) आश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे साडेपाच वाजता महापूजेने ब्रह्मोत्सवास सुरुवात होणार आहे. ब्रह्मोत्सवाअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) महापूजा, सामूहिक तुलसी अर्चना, ध्वजपूजन, शनिवारी (दि. २३) कुंकूम अर्चना, रविवारी (दि. २४) हिरण्य अर्चना, कुमारिका पूजन, महालक्ष्मी मंदिर महावस्त्र अर्पण सोहळा, सोमवारी (दि. २५) पुष्पार्चना यांसह दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेला गुरुवारी (दि. ५) ब्रह्मोत्सवाची सांगता होणार असून, या ब्रह्ममहोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.