शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

होय, नोटाबंदी फसलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:01 IST

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्या आणि देशवासीयांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी नोटाबंदी ही दहशतवाद्यांना होणारी मदत रोखणारी आणि काळा पैसा असणाºयांसाठी कशी रामबाण ठरेल असे त्यांनी ठासून सांगितल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आणि बॅँकेत उभे राहणाºयांनीही देशासाठी एक दिवस रांगेत उभे राहिले तर गैर काय, असा प्रश्न करून नोटाबंदीचे समर्थन केले होते. याच नोटाबंदीच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असताना मात्र नोटाबंदीच्या समर्थनात घसरण झालेली दिसते आहे.

नाशिक : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्या आणि देशवासीयांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी नोटाबंदी ही दहशतवाद्यांना होणारी मदत रोखणारी आणि काळा पैसा असणाºयांसाठी कशी रामबाण ठरेल असे त्यांनी ठासून सांगितल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आणि बॅँकेत उभे राहणाºयांनीही देशासाठी एक दिवस रांगेत उभे राहिले तर गैर काय, असा प्रश्न करून नोटाबंदीचे समर्थन केले होते. याच नोटाबंदीच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असताना मात्र नोटाबंदीच्या समर्थनात घसरण झालेली दिसते आहे.‘लोकमत’ने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात नोटाबंदीचे कट्टर समर्थन करणाºयांची मानसिकता बदलल्याचे दिसून आले. विशेषत: नोटाबंदीनंतर जितकी रक्कम चलनात होती, तितकीच जमा झाल्याने त्यातून फार मोठे काळे धन हाती पडल्याचे दिसले नाही, त्यामुळेच ही नोटाबंदी फसवी असल्याचे मत सर्वेक्षणात आढळून आले. अर्थात, पंतप्रधानांनी प्रयत्न केलेत असेही मत सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले, तर काहींनी नोटाबंदीचा भाजपाच्या नेत्यांनाच फायदा झाला, असा सरळ सरळ आरोपही केला. लोकमतने या सर्वेक्षणाअंतर्गत विविध क्षेत्रांतील शंभर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेतले आणि त्यांना तीन प्रश्न केले. त्यानुसार नोटांबदी यशस्वी झाली असे वाटते काय, या प्रश्नावर ५५ टक्के लोकांनी नकारात्मक मत व्यक्त केले, तर ४५ टक्के लोकांनी यशस्वी झाल्याचा दावा केला.नोटाबंदीमुळे भविष्यात भ्रष्टाचार बंद होईल काय, या विषयावर तर सपशेल नकारार्थी मत नोंदविण्यात आले आहे. ८० टक्के नागरिकांनी भ्रष्टाचार थांबणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नोटाबंदीमुळे कॅशलेस व्यवहार वाढल्याचा दावा केला गेला. तो खरा असला तरी अजूनही शंभर टक्के नागरिकांची कॅशलेस व्यवहाराची मानसिकता नाही. तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करण्यात येणारा अडसर आणि आॅनलाइनमुळे खरोखरच व्यवहार विश्वासार्ह होईल असे वाटत नसल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी नागरिकांनी व्यक्त केले. आॅनलाइन व्यवहारात वाढ झाल्याचे मत एकूण ६० टक्के लोकांनी नोंदवले, तर चाळीस टक्के नागरिकांनी त्याकडे वळलो नसल्याचे सांगितले.